in ,

Payal Rohatgi| गांधी परिवाराची बदनामी केल्या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल…

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) विरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी पायलवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम १५३(अ), ५००, ५०५ (२) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी व्हिडिओ बनवल्यामुळे पायल रोहतगीसह इतर एका अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पायल रोहतगीने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींसह काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटे बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. असे म्हणतं संगीता तिवारी यांनी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी संगीता तिवारी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी ही तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.

यापूर्वी पायल रोहतगीने काँग्रेस आणि नेहरू घराण्यावर टीका केली होती. त्यावेळेस याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. मग तिने माफी मागितली. पण पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून पायल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

याआधी जून महिन्यात पायलला अहमदाबादमध्ये पोलिसांनी अटक केलं होतं. पायलवर ती राहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षला सोशल मीडियावर अश्लील भाषेत मेसेज करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढंच नाही तर इतरांनाही खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचाही तिच्यावर आरोप करण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार; १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत करणार चर्चा

वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता;यासह मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय