in

उपचाराची फी मागितल्याने डॉक्टरचे बोट छाटले

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात डॉक्टरने फी मागितल्यामुळे रुग्णाने त्याचे बोट कापल्याचे समोर आले आहे. विषय इथेच थांबला नाही, तर दोन तरुणांनी या क्लिनिकची तोडफोड देखील केली. दोघेही तरुण दारूच्या नशेत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कुन्डीपुरा भागात डॉक्टर बिंद्रा यांचे क्लिनिक आहे. रात्रीच्या वेळी विजय आणि आकाश हे तरूण क्लिनिकमध्ये आले. अंडापाव विक्रेत्यासोबत वाद झाल्यानंतर गरम तेल हातावर पडल्याने विजय जखमी झाला होता. त्याला घेऊन
आकाश तिवारी बिंद्रा यांच्या क्लिनिकमध्ये गेला. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर फी मागितली. मात्र, ती जास्त असल्याचे सांगून त्यांनी डॉक्टरांशी वाद घातला. त्यांनी डॉक्टर बिंद्रा यांच्या हाताचे बोट छाटले. तसेच या क्लिनिकची तोडफोड केली. यावेळी डॉक्टरला मारहाण झाल्याचेही वृत्त समोर आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्रोही साहित्य संमेलानाचे पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला निमंत्रण?

उत्तराखंड : ऋषभ पंत चेन्नई टेस्टचं मानधन देणार हिमस्खलनातील पीडितांना