in

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली.

डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल मोदींचे सहकारी, देशमुखांचा हल्ला

दरम्यान, मंगळवारी अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं देशमुख म्हणाले होते. त्यावरून सभागृहात एकच गदारोळ माजला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन्वय नाईक प्रकरणी फडणवीसांचा गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग

मुंबईच्या रस्त्यावर धावू लागली घोड्याविना व्हिक्टोरिया, आनंद महिंद्रांकडून कौतुक