in

नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन; ‘या’ गोष्टींवर बंदी

राज्यासह जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आलेत.

नाशिक जिल्ह्यात रविवारी 645 नवे रुग्ण आढळले होते तर आज 675 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे अवघ्या 2 दिवसांत 1320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत. बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभांवर पूर्णतः बंदी लादण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, कोरोना जनजागृती सप्ताहही राबवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात आज 9 हजार रुग्ण कोरोनामुक्त

महिलांसाठी गुगलची मोठी घोषणा; 10 लाख भारतीय ग्रामीण महिला उद्योजकांना करणार मदत