राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबादमध्ये येत्या 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. शनिवार रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार. तर या काळामध्ये प्रार्थनास्थळे, सभा, आठवडी बाजार आणि मार्चा यांना बंदी असणार आहे. अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली .
या संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होती.
Comments
Loading…