गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचापाठोपाठ अभिनेता आर माधवन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आता त्यानंतर बॉलिवूड लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.
दुर्दैवाने, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील १० दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपा करून कोरोनाची चाचणी करा, अशी विनंती परेश रावल यांनी केली आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
Comments
Loading…