राज्यात कोरोनामुळे सर्वच शाळांमधील शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू असताना ज्या खाजगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर प्रकार सर्वच प्रकारच्या शुल्काची वसुली केली. या विरोधात आज पालक संघटना शिक्षण विभागाच्या विरोधात पालक आणि पाल्य आज आझाद मैदानात उतरणार आहे. दरम्यान शालेय शिक्षण विभागाकडे असंख्य तक्रारी करूनही त्यावर शिक्षण विभागाने ठोस भूमिका घेतली नाही म्हणून हे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राज्यभरातील 13 पालक संघटना एकत्र येवून हे आंदोलन करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरु असतानाही, राज्यातील अनेक खासगी शाळांकडून संपुर्ण फी वसूली करण्यात आली आहे. आणि फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून बाहेर काढले जात आहे. तर काही शाळांमध्ये दहावीचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरुन दिले जात नाही येत.
खासगी संस्थाचालकांकडून करण्यात आलेल्या शुल्काच्या लूटी विरोधात पालकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याला दाद मिळाली नाही. शिक्षण मंत्र्यांनी वेळोवेळी न्यायालयात याविषयीचा खटला प्रलंबित असल्याचे सांगून पालकांना न्यायापासून वंचित ठेवले. यामुळे आपण शालेय शिक्षण विभागाच्या या भूमिकेविरोधात हे आंदोलन करत असल्याची माहिती फोरम फॉर फैरनेस इन एज्युकेशन आणि इंडिया व्हाइड पॅरेंटस असोसिएशन या संघटनांकडून देण्यात आली.
Comments
Loading…