in ,

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता, निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे. अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केलाय मुंबईच्या एका निवृत्त एसीपीनं. निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.

शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होती अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शब्द पाळला; रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरेला शिवसेनेने दिले हक्काचे घर

प्लॅटफॉर्म तिकीटचे दर पूर्ववत, मध्य रेल्वेची माहिती