in

वाटेवरचा ”पाडुरंग” गेला…

Share

प्रशांत गोमाणे : गेल्या जवळपास 4-5 महिन्यापासून कोरोना महामारीविरोधात असंख्य योद्धे लढतायत. मग ते डॉक्टर्स असोत, पोलीस असोत अथवा पत्रकार… या साऱ्यांनाच ‘विटेवरचा पाडुरंग वाटेवर’ उभा असल्याची उपमाही देण्यात आली होती. मात्र हेच योद्धे कोरोना विरोधात लढता लढता मृत्युमुखी पडत आहेत. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पत्रकार पांडुरंग रायकर.

रायकर हे कोरोना सारख्या भीषण महामारीत ‘पाडूरंगा’प्रमाणे पुण्याच्या प्रत्येक वाटेवर उभे राहून सामान्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अशा प्रत्येक बातम्यांच स्थळ गाठता -गाठता रायकर यांना कोरोनाने गाठलं. यानंतर सुरु झाली ती रायकर यांना कोरोनामुक्त करण्याची मोहीम…

30 ऑगस्ट रोजी रायकर यांना जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हे तेच सुसज्ज अस हॉस्पिटल आहे ज्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे दर्शवलेल्या उपस्थितीत पार पडले. तसेच कोरोना काळात बनवल्या गेलेल्या याच हॉस्पिटलमुळे पुणे कोरोनामुक्त होण्याची अपेक्षा सामान्य नागरिक बाळगून होते. मात्र रायकर यांच्याबाबत येथे काही वेगळेच घडले.

उपचारा दरम्यान रायकर यांनी ऑक्सिजनची पातळी घटली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.पण त्याचवेळी पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. मात्र जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.त्यामुळे निव्वळ अ‍ॅम्ब्युलन्स अभावी एखाद्याचा मृत्यू व्हावा हे फारच दुदैवी आहे. जर एखाद्या पत्रकाराला सरकारी यंत्रणा योग्य औषध उपचार देऊ शकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील हे या घटनेतून दिसून येतचं आहे.

दरम्यान पांडुरंग यांच्या मृत्यूचं प्रकरण मीडियानं लावून धरल्यावर आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. पण पांडुरंग रायकरला कुणी मारलं? पाडुरंगचा मृत्यू कोरोनामुळे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाला ? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अमरावतीत चारचाकी झाडावर धडकून तीन ठार

फुटबॉल जगतातला ‘हा’ दिग्गज खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह