in

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जातीच्या कार्डाची झालर…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहेत. या पोटनिवडणूकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत थेट लढत होणार आहे. त्यात आता या निवडणुकीत जातीचं कार्ड खेळले जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपने व्युहरचनाही आखली असून आता यात राष्ट्रवादी कुठले कार्ड खेळते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवाराची जुळवाजुळव करण्यात दोन्ही पक्ष लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे कुठेतरी राष्ट्रवादी भालके यांच्या कुटुंबियाना उमेदवारी देऊन सहानुभूती मते मिळवण्याचे कार्ड खेळू शकते. तसेच दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. दरम्यान भालके कुटुंबातील उमेदवार जाहीर करण्यास होत असलेला उशीर म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात जात असल्याचं बोललं आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान अद्याप तरी दोन्ही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली नाही आहे. मात्र आता दोन्ही पक्ष नेमके कुठले उमेदवार मैदानात उतरवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पोटनिवडणुक कार्यक्रम

  • अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
  • अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
  • मतदान – 17 एप्रिल 2021
  • निवडणूक निकाल – 2 मे 2021

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Bus | एसटी बसची ट्रकला धडक; १५ जखमी

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्यात माहीर, नाना पटोले यांची टीका