in

वास्तूविशेष : पंचतत्व आणि वास्तूची रंगसंगती!

लोकशाहि विशेष मध्ये आज आपण “पंचतत्व” आणि आपल्या वास्तुची रंगसंगती याबद्दल जाणून घेऊया.

आपली सृष्टी, निसर्ग यामध्ये चराचर म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांचे जे जीवनचक्र चालू असतं, त्यांना लागणारा समतोल ज्या प्रमुख गोष्टींमुळे साधला जातो, त्यांनाच आपण “पंचतत्व” असे म्हणतो. पंचतत्व जेव्हा बॅलन्स (संतुलित) असतात, तेव्हाच सृष्टीचं जीवनचक्र नियमित चालू असतं आणि जेव्हा ही पंचतत्व इम्बलेंस (असंतुलित) होतात, तेव्हाच नैसर्गिक आपत्ती अथवा निसर्गकोप आपण अनुभवतो.

ही पंचतत्व किंवा पंचमहाभूतं म्हणजेच “जल”, “वायू”, “अग्नी”, “पृथ्वी” आणि “अवकाश”. जशी सृष्टी पंचतत्वांनी नटलीय तशाच प्रकारे सृष्टीमधल्या प्रत्येक घटकांमध्ये पंचतत्वांचं अस्तित्व सामावलं आहे. माणसाचे शरीरसुद्धा पंचतत्वांनी बनलेल असून, ते पंचतत्वातच विलिन होतं. सृष्टीवरचा प्रत्येक घटक पंचतत्वाच्या नियमांनी संतुलित असतो.

आपला वास असणारी “वास्तूसुद्धा” पंचतत्वांनी नियमित असते, म्हणूनच वास्तू कंसल्टिंग करणं म्हणजेच उपायशास्त्र असून त्याचा गाभा तसेच पिंड पंचतत्व आहे. जशी शरीराची पंचतत्व बिघडली की आपली तब्येत बिघडते, तशीच वास्तुची पंचतत्व बिघडली की, वास्तूपुरुषाची ऊर्जाक्षेत्र बिघडतात आणि आयुष्यात आपल्याला विपरीत परिणाम भोगावें लागतात.

इथे प्रमुख्यान सांगावस वाटत की, बराचवेळा पंचतत्व बिघडायला आपण स्वतःच कारणीभूत असतो, कारण वास्तूमधील ऊर्जा ही नेहमी आपल्या उर्जेशी निगडीत रहात असून जेव्हा कधी आपण त्या वास्तूचं नूतनीकरण किंवा सुशोभीकरण करतो, तेव्हा त्या वास्तूच्या पंचतत्वांना छेडल गेलॆ तर, नकारात्मक ऊर्जा कार्यरत होते.

जल-वायू-अग्नि-पृथ्वी-अवकाश :
प्रत्येक तत्व इतर तत्वांशी निगडित असतं. म्हणजे प्रत्येक तत्व क्रमाने येणाऱ्या पुढच्या तत्वाला पूरक असतं आणि प्रत्येक तत्व क्रमाने एक सोडून येणाऱ्या पुढच्या तत्वाला नष्ट करतं. म्हणूनच जलतत्व, वायूतत्वाला पुरकत्व देतं. परंतू वायुतत्वाच्या पुढच्या म्हणजे अग्नितत्वाला नष्ट करतं. म्हणजेच आपण पाहतो की, पाणी अग्निला विझवितं. तसेच इतर तत्वांच्या बाबतीत घडतं.

प्रत्येक तत्वाला विशिष्ट आकार, रंग, धातू असतो. म्हणूनच नूतनीकरण करताना आपल्या वास्तूच्या रंगसंगतीला विशेष महत्व आहे. आपल्या घराच्या उत्तरेकडे जलतत्व – निळा, पूर्वेकडे वायूतत्व – हिरवा, दक्षिण-आग्नेयाकडे अग्नितत्व – लाल, नैऋत्येकडे – पृथ्वीतत्व – पिवळा आणि वायव्येकडे अवकाशतत्व – पांढरा अस्तित्वात असते. म्हणूनच रंगसंगतीचा विचार खूप महत्वाचा आहे. असे रंग देणं व्यावहारीक दृष्टीने शक्य असेलच असे नाही. पण प्रामुख्यानं विरोधी रंगसंगती नक्कीच टाळावी. आपल्या घरात ज्या तत्वाचा प्रभाग जास्त असेल तिथे विरोधी रंगभास तर, ज्या तत्वाचा प्रभाग कमी प्रमाणात असेल तिथे अनुकूल रंगसंगती करुन वास्तू समतोल राखण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे, क्रीम किंवा आयव्हरी रंग न्युट्रल किंवा संतुलित रंगसंगती देतात. कुठलेही भड़क रंग तत्वाची तीव्रता वाढवतात तर, खूप सौम्य रंग तत्वाला सौम्य करतात.

सात्विक विचार जसे मनाला प्रसन्नता देतात तसेच घरामध्ये नूतनीकरण होताना आपल्या वास्तुची रंगसंगती आणि त्यामुळे संतुलित होणारी पंचतत्व आपल्या आयुष्यात नोकरी किंवा उद्योगधंद्यात नवीन संधी, कौटुंबिक सुख, आरोग्यसंपदा, स्थिर-लक्ष्मी, आणि समाधान प्राप्त करण्यास उपयुक्त ठरतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बर्थ डे सेलिब्रेशन पडलं महागात !

म्हाडाकडून टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 फ्लॅट्स, रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी निर्णय