in

पी.व्ही. सिंधू लंडनला रवाना ; ट्वीट करून दिलं कारण

Share

वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ऑलिम्पिक तयारीसाठी असलेलं नॅशनल कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅम्प सोडून सिंधू थेट लंडनला रवाना झाली आहे. दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या कुटुंबात वाद असल्यामुळे ती लंडनला गेल्याचे समोर आले होते, मात्र सिंधूनं स्वत: याबाबत स्पष्टीरकरण दिले आहे.

सिंधूनं ट्वीट करत ती 10 दिवसांआधीच लंडनला आल्याचे सांगितले. तंदुरुस्ती आणि न्यूट्रीशिअनसाठी यूकेला गेल्याचं तिने म्हटले आहे. दरम्यान, याआधी अशा चर्चा होत्या की, कौटुंबिक सिंधूने अचानक शिबिर सोडून लंडनला रवाना झाली. मीडिया रिपोर्टनुसार, सिंधू आपल्या कुटुंबावर रागावली होती. मात्र आता सिंधूने ट्विटरवर आपलं निवेदन देऊन या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने काही दिवसांपूर्वी लंडनला मी आले आहे. जेणेकरून मी माझ्या पोषण आणि तंदुरुस्तीवर काम करू शकेन. माझ्या इथे येण्याबद्दल पालकांनाही माहिती असते आणि कौटुंबिक तणाव काहीही नाही आहे.

सिंधू 8 ते 10 आठवडे असणार लंडनला
हैदराबादहून लंडनला जाण्यापूर्वी सिंधूने प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही तिच्या निर्णयाबद्दल माहिती दिली होती. ऑलिम्पिकमधील स्वप्ने साकारण्यासाठी ती आता लंडनमध्ये पुढील 8 ते 10 आठवड्यांपर्यंत थांबणार असल्याचे वृत्त आहे. यावेळी, तज्ज्ञांचे पथक गॅटोराडे क्रीडा विज्ञान संस्थेच्या रेबेका रँडेलसह सिंधूवर लक्ष ठेवणार आहे. सिंधू लवकरच इंग्लंडमधील तज्ञांच्या टीमबरोबर तिचे प्रशिक्षण सुरू करणार आहे.

लंडनमध्येच करणार प्रशिक्षण
सोमवारी इंग्लंडमध्ये चांगले वाटत असल्याचे सिंधूने ट्विटरवर लिहिले. काही आठवड्यांत, मी माझ्या तंदुरुस्तीसाठी जीएसएसआय बरोबर कार्य करेन. 3 महिन्यांनंतर आशिया दौरा आहे आणि स्वत: ला सुधारण्याची ही एक उत्तम संधी आहे. दरम्यान सिंधू लवकर भारतात परतण्याची शक्यता कमी आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Corona Vaccine | कोरोना लससाठी डिजिटल हेल्थ आयडी कार्ड महत्वाचे ; PM नरेंद्र मोदी

DDLJ @25 | काजोल- शाहरूखच्या सोशल मीडियावरील फोटोने वेधले लक्ष