in

बिस्कीट डिझाईनच्या कॉपी संदर्भात ओरियो कंपनीची उच्च न्यायालयात धाव

जगभरात आपल्या वेगळ्या पॅकेजिंग आणि डिझाईनमुळे प्रसिद्ध असणाऱ्या ओरियो बिस्कीट कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पार्लेच्या फॅबियो बिस्कीटचे डिझाईन हे ओरियोच्या बिस्कीटप्रमाणे असल्याचा आरोप करत ओरियोने या विरोधात याचिका दाखल केली आहे.

अमेरिकेतील मोंडलीज इंटरनॅशनलच्या इंटरकॉन्टिनेन्टल ग्रेट ब्रान्ड्स ने ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 एप्रिलला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. मोंडलीज कंपनीने 10 वर्षापूर्वी भारतात ओरियो बिस्कीट लॉन्च केलं होतं. तर पार्ले कंपनीने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये आपले फॅबिया प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. या संदर्भात उच्च न्यायालय काय निर्णय देणार या गोष्टीकडे सर्वाचेच लक्ष आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वेस्टर्न आऊटफिटला पसंती देणाऱ्या कंगनाची अमेरिकन वेशभूषेवर टीका

Maharashtra budget session | सरकार काळजीवाहू आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य