मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ठाकरे सरकारने हा तपास एटीएसकडे सोपविला होता. तर, केंद्र सरकारने एनआयएकडे ही जबाबदारी दिली होती. आता ठाणे न्यायालयाने या प्रकरण एनआयएला सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ एका गाडीत स्फोटके सापडली. त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन होते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची बातमी आली. त्याचवेळी ठाणे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे जाहीर केले होते. पण विरोधक आक्रमक झाल्यावर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविला. पण केंद्राने एनआयएकडे दिला.
मात्र तरीही एटीएसने या प्रकरणाची सूत्रे एनआयएकडे दिली नाहीत. उलट या प्रकरणात दोघांना अटक करून पत्रकार परिषद देखील घेतली होती..पण आता ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवायला सांगितले असून हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments
Loading…