in

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकल्याने पंतप्रधानांचा विरोधकांना टोला

लोकशाही न्यूज नेटवर्क | राष्ट्रपतींचं भाषण आत्मविश्वास निर्माण करणार होतं. देशाला नव्या दशकातील वाटचालीचा मार्ग दाखवणारं होतं,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले. यावेळी मोदी यांनी आभार मानतांना अभिभाषणावर बहिष्कार टाकल्यावरून विरोधकांना चिमटा काढला.

मोदी म्हणाले,” मी राष्ट्रपतींचे आभार मानन्यासाठी इथे उभा आहे. राज्यसभेत १३-१४ तास सदस्यांनी आपले विचार मांडले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. चांगल झालं असतं, जर राष्ट्रपतींचं भाषण ऐकायला असते. लोकशाहीची गरिमा वाढली असती. आपल्या सगळ्यांच्या मनात खंत राहिली नसती की भाषण ऐकलं नाही. पण राष्ट्रपतींचं भाषण इतकं प्रभावशाली होतं की, न ऐकताही सदस्य बरंच बोलले. त्यामुळे या भाषणाचं मूल्य खूप आहे,” असं म्हणत मोदींनी विरोधकांना चिमटाचं काढला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूरमध्ये नागरिकांनी केली गुंडाची हत्या

शेतकरी आंदोलनाशी संबंधीत पाकिस्तानी अकाउंट्स बंद करा; सरकारने दिले ट्विटरला निर्देश