in

‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात होणार नाही

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत आज बैठक घेतली. ही बैठक संपल्या नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठक संपल्या नंतर माध्यमांशी संवाद साधला. बैठकीमध्ये कोरोना आणि लसीकरण संबधित गोष्टींचा आढावा घेतला अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तर महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दाखवला.

शरद पवार लसीकरणा संबंधित गोष्टींबाबत स्वत: सिरम इन्स्टिट्यूट सोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन्स लोटस होऊ देणार नाही असे नवाब मलिक यावेळी म्हणले. केंद्र सरकार कडून सहकारी बँका संपवण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.या बैठकीमध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुद्धा झाली.

मराठा आरक्षणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय. भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा केला असून, त्यांनी अनेक पक्षातील नेत्यांची मतंही जाणून घेतलीत. त्यानंतर मराठा आरक्षणावरही अनेक नेत्यांनी भाष्य केलं. त्याच प्रमाणे 10 जूनला नियम पळून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करणार अशी माहिती देखील त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना उपचारांसाठी दर निश्चित, पाहा कोरोना झाल्यास किती होईल खर्च …

Maharashtra Corona Update: रिकव्हरी रेट वाढला… राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही घटली!