in

ऑनलाईन फूड ऑर्डर महाग होणार , केंद्र सरकार जीएसटी लावण्याच्या तयारीत

जर तुम्ही ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवत असालं तर यापुढे तुम्हाला कदाचित त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यापुढे ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर जीएसटी लागण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या फिटमेंट पॅनेलने झोमॅटो, स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना ई-कॉमर्स ऑपरेटर मानलं जावं आणि त्यांच्यावर 5 ते 18 टक्क्यांचा जीएसटी लावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तब्बल 20 महिन्यांनी ही जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. ही बैठक शुक्रवारी लखनऊमध्ये होणार असून यामध्ये पेट्रोल-डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक होणार असून त्यामध्ये हा निर्णय होणार आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान ऑनलाईन फूड कंपन्यांच्या डिलिव्हरीमध्ये मोठी वाढ झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चक्क… पेन्सिलपासून साकरला गणपती बाप्पा

‘कोरोना विरुद्धची लढाई’; वैती कुटुंबीयांनी साकारला घरगुती गणपतीत देखावा