केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यावर काँग्रेसच्यावतीनं आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत केंद्र सरकाराचा निषेध केलाय. केंद्रानं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या, पोस्टरबाजी करत मोदी मोराला दाणे खावू घाला ,मात्र कांदा निर्यात करू द्या असा उपरोधिक टोलाही मोदींना कार्यकर्त्यांनी लगावलाय आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांदा निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.
Comments
0 comments