in

नवीमुंबईत अतिक्रमण विभागाच्या कारवाईत एकाचा मृत्यू

नवी मुंबईतील नेरूळ गावच्या समोर असणाऱ्या झोपडपट्टीवर आज अतिक्रमण विभागाने केलेल्या तोडक कारवाईत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली.

नेरुळ मधील भूखंडावर अतिक्रमण करण्यात आलेल्या झोपडपट्टीवर आज मनपा प्रशासनाने बुलडोजर फिरवला खरा मात्र झोपडपट्टीवर तोडक कारवाई करताना झोपड्यांमध्ये कोणी व्यक्ती आहे की नाही याची शहानिशा न करताच कारवाई केली. या तोडक कारवाईत 44 वर्षीय भीमराव गजभार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मृत इसमाच्या नातेवाईकांनी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित मनपा अधिकारी व JCB ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मयतच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करत कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई

Mumbai Local | मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू