कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशामध्ये आज (23 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेपर्यंत 1 कोटी 17 लाख 54 हजार 788 लोकांना लस देण्यात आली. यात 68 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर, 62 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. तर, 41 टक्क्यांहून अधिक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात माहिती दिली. 1 कोटी 17 लाखांहून अधिक लसीकरण करण्यात आले. त्यापैकी एक कोटी चार लाख लोकांना पहिला डोस देण्यात आला. तर, 12 लाख 61 हजार लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात कोरोनाचे दीड लाखांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात अजूनही 75 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशाच्या तुलनेत केरळमध्ये 38 टक्के तर, महाष्ट्रात 37 टक्के रुग्ण आहेत, असेही ते म्हणाले.
Comments
Loading…