in

बीडमध्ये अंधश्रद्धेचा कळस…करणीच्या संशयातून चिमुकल्याची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा वर्षांच्या मुलाचा नरबळी दिल्याचा खुलासा पोलीस तपासात झाला आहे. शाळेत खेळायला गेल्यानंतर मुलगा घरात न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र शाळेच्या आवारात मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि गुन्ह्याची पाळंमुळं खोदून काढली.

दरम्यान, म्हशीला करणी करून ठार मारण्यात आल्याने त्याचा बदला घेण्यासाठी मुलाचा नरबळी दिल्याचा खुलासा झाला आहे. शुभम सपकाळ असे या चिमुरड्याचे नाव असून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात त्याचा मृतदेह आढळला.

नेकनूर पोलिसांनी याविषयी गावात तळ ठोकून कसून चौकशी केली. यावेळी म्हशीवर करणी केल्यामुळे या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला पोलिसांना त्याब्यात घेतले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठी भाषेवरुन मनसे पुन्हा आक्रमक

देव तारी त्याला कोण मारी…