in

थरार… अरे बापरे मुलीच्या गळ्यात साप

वर्धात मुलीच्या गळ्याला सापाने घेरा घातला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला आहे, दोन तासांनंतर रात्री दंश झालंयवर तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक नागाच्या फुसकारण्याचा आवाज आला, आणि शेजारी झोपलेले वडील जागे झालेय. अचानक घरात जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्यात गुंडाळलेला नाग पाहून पालकांचीही भंबेरी उडाली.

बाजूलाच झोपून असलेल्या आईला उठवून शेजाऱ्यांना बोलविण्यात आले. गड्याला साप गुंडाळून असल्याचे पाहून अनेकांना काहीच सुचेनासे झाले. झोपेत असणाऱ्या मुलीचे डोळे उघडले. पण पालकांनीच तिला ‘हलू नको बेटा स्तब्ध रहा ! ‘ असाच सल्ला दिला. मुलगी घाबरली नाही , शांत पडून राहीली. रात्रीत लगेच सर्पमित्रांना बोलविण्यात आले. रात्री बारा वाजता गड्याला गुंडाळी घालून असणारा साप मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राहिला. अखेर असह्य झाल्यावर मुलीने हालचाल केली आणि सापाने दंश केला.

सर्पमित्र तेथे पोहचल्यावर मात्र दिवाण खाली जाऊन तो साप दिसेनासा झाला. सेलू तालुक्यातील झडशी गावाजवळच्या बोरखेडी कला येथे घडलेली थरारक घटना अंगावर काटे निर्माण करणारी आहे. झोपेत असणाऱ्या मुलीच्या गळ्यात साप गुंडाळण्याच्या घटनेने बोरखेडी परिसरात चांगलीच चर्चा आहे. सर्पदंश झालेल्या दिव्यांनी पद्माकर गडकरी या सात वर्षीय मुलीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भरदिवसा तरुणाचा भोसकून खुन, खुनाची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला दिला चोप