in

महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग कमी; आरोग्य विभागाची माहिती

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोव्हिडचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रानं अतिशय गांभीर्यानं आणि काळजीपूर्वक पावली उचलली आहेत. यामुळे कोव्हिडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग किंवा मृत्यूदर कमी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमी होताना दिसत आहे.

महाराष्ट्रानं वेळोवेळीच आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन केलं असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. एकूण मृतांची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर १० लाख लोकसंख्येत मृत्यूचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकेडवारीनुसार, दिल्लीत ६४७, गोव्यात ५२७, पुद्दुचेरीत ५२२ आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर १० लक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू झालेलं राज्य म्हणता येणार नाही.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.६७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात दिवसांगणिक उपचाराधिन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सध्या ३५ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 572 दिवसांवर पोहोचला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपुरात आजपासून शाळेची घंटा वाजणार

‘सूर्या सिंघम’ सुपरस्टार सूर्या शिवकुमार कोरोना पॉझिटिव्ह