फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना रग्णांची संख्या वाढली आहे. यानंतर प्रत्येक स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत महापालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केलीय. याअंतर्गत दोन दिवसांमध्ये मुंबईतील १ हजार ३०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मुंबई महापालिकेने बाधित रुग्ण सापडताच इमारती टाळेबंद करण्याचा, तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. या नियमात वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यानुसार दहापेक्षा अधिक रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत पूर्णपणे टाळेबंद करण्यात येत होती. मात्र, आता पाच रुग्ण सापडले तरी इमारत कुलुपबंद करण्यात येत आहे.
मुंबईत १ फेब्रुवारी रोजी ३२८ जणांना करोनाची बाधा झाली होती आणि त्यावेळी तब्बल दोन हजार २२ इमारती टाळेबंद होत्या. तर १७ फेब्रुवारी रोजी टाळेबंद इमारतींची संख्या घसरून ५४५ झाली होती. बहुतांश इमारतींमध्ये नियोजित मुदतीत नवे रुग्ण न सापडल्याने त्या पुन्हा सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अचानक टाळेबंद इमारतींच्या संख्येत वाढ झाली आहे.
Comments
Loading…