in ,

आता 24×7 मिळणार कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ग्वाही

देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात ट्विट केले आहे त्यामध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही लस घेऊ शकतील.

१ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना मंगळवारी संध्याकाळपर्यंत गोळा झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १ कोटी ५४ लाख ६१ हजार ८६४ जणांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ४ लाख ३४ हजार ९८१ लाभार्थ्यांचा आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील ६० हजार ०२० व्यक्तींचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विद्यार्थी नेता शरजील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण!

Tech Update : Samsung Galaxy A32 लाँच , पाहा फीचर्स आणि किंमत