in

आता दुसऱ्याचं WhatsApp स्टेटस डाऊनलोड करता येणार

Share

इस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp चा वाढता वापर पाहता कंपनीकडून ऍपमध्ये अनेक नवीन फिचर्स अपडेट करण्यात येत आहेत. व्हॉट्सअपच्या नव्या अपडेटमध्ये युजर्सला ऑलवेज म्यूट, मीडिया गाईडलाईन्स यांसारखे अनेक नवे फिचर्स मिळणार आहेत. याशिवाय व्हॉट्सअपकडून अजूनही अनेक नव्या फिचर्सच्या बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरु आहे. सर्वात आधी अँड्राईड युजर्सला हे नवे फिचर्स देण्यात येणार आहेत. आता व्हॉट्सअपवर आणखी एक फीचर आलं असून याद्वारे दुसऱ्याचं व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करता येणार आहे.

दुसऱ्याचं व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करण्याची ट्रिक केवळ अँड्राईड युजर्ससाठी आहे. व्हॉट्सअप स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी फोनमध्ये Status downloader for Whatsapp ऍप डाऊनलोड करावं लागेल. ऍप ओपन केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील. ज्यात पहिला ऑप्शन टू चॅट आणि दुसरा ऑप्शन स्टेटस डाऊनलोडर आहे. त्यात दुसऱ्या स्टेटस डाऊनलोडरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इतरांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ दिसतील. आता जो फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ फाईल मॅनेजरमध्ये असणाऱ्या स्टेटस डाऊनलोडर फोल्डरमध्ये स्टोर होतील.

Always Mute –

या फीचरद्वारे व्हॉट्सअप युजर्स कोणत्याही चॅटला एक वर्षापर्यंत म्यूट करु शकतात. हे फीचर ग्रुप आणि सिंगल चॅट दोन्हीसाठी काम करतं. WABetaInfo ने असंही सांगितलं आहे की, हे फीचर लगेचच दिसत नाही, हे काही दिवसांत इनेबल होऊ शकतं.

Media Guidelines –

पब्लिक बीटा टेस्टिंगसाठी Media Guidelines फीचर इनेबल करण्यात आलं आहे. मीडिया गाईडलाईन्समध्ये स्टिकर्स अलाइनमेंट आणि व्हिडिओ, जिफ आणि इमेजसह टेक्स अपडेट करण्याचंही फीचर मिळणार आहे.

त्याशिवाय व्हॉट्सअपचं आणखी एक फीचर येणार आहे. ज्याचं नाव हायडिंग व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल म्हणजेच व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल लपवण्याचं फीचर, हे फीचर सध्या उपलब्ध नाही परंतु येणाऱ्या काही दिवसांत हे फीचर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोकण व मध्य महाराष्ट्रासह मुंबईत पावसाची शक्यता

Hathras Case ; तृणमूलच्या नेत्यांनाही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखलं