केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्या गुरुवारी देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने या आंदोलनाची हाक दिली आहे.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी गेल्या जवळपास 82 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.मात्र आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही आहे. एकीकडे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून वेळोवेळी चर्चेची तयारी दर्शवली जात आहे. याशिवाय ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर देशातील राजकीय वातावरण देखील चांगलच तापलं आहे.
दरम्यान मुजफ्फरपुरात अखिल भारतीय कृषक खेत मजदूर संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात विहिंपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा संयुक्त किसान मोर्चाने निषेध केला. तसेच गुरुवारी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात शांततेत निषेध नोंदवण्याचे आवाहनही संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.या आंदोलना दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करणार असल्याचे किसान आंदोलन समिती, गाझीपूर सीमा समितीचे प्रवक्ता जगतरसिंग बाजवा यांनी सांगितले.
Comments
Loading…