in

चिनी PUBG ऐवजी आता भारतीय FAU-G

Share

देशाच्या सुरक्षेसाठी भारताने 118 चाइनीज अँप्सवर बंदी घातली. त्यामध्ये भारतात सर्वाधिक पसंतीच्या PUBG गेमचाही समावेश आहे. मात्र आता पब्जीप्रेमींसाठी एक खूशबर ती म्हणजे चिनी पब्जीप्रमाणेच आता भारतात FAU-G गेम लाँच होणार आहे. खिलाडी अक्षय कुमारनेच या मेड इन इंडिया गेमची घोषणा केली आहे.

2 सप्टेंबरला चिनी PUBG बॅन होताच दोन दिवसांत भारतात FAU-G गेमची घोषणा करण्यात आली आहे. Fearless and United: Guards असं या गेमचं पूर्ण नाव आहे. हा गेम बंगळुरूतील कंपनी nCORE गेम्स रिलीज करणार आहे. अक्षय कुमार या गेमचा पहिला गेमिंग वेंचर आहे. अक्षयने आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

“पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत चळवळीचं समर्थन करत हा अँक्शन गेम आणताना मला खूप अभिनान वाटतो आहे. Fearless And United-Guards FAU-G. गेम्समधून मनोरंजनाशिवाय प्लेअर्सना सैनिकांना किती बलिदान द्यावं लागतं, हेदेखील समजू शकेल. या गेममधून होणाऱ्या कमाईचा 20% भाग भारत के वीर ट्रस्टला दिला जाणार आहे”, असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह

Weather Forecast: पुढील तीन तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस