पुण्यातील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी या परिसरात गज्या मारणे आणि त्याचे साथीदार फिरत असल्याची माहिती सातारा पोलिसांना समजली.
या माहितीनुसार जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी या परिसरातील सर्वच पोलिस ठाण्यांना रेकी करण्यास सांगितले होते. गज्या मारणे बसलेला असलेली गाडी मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौकात आल्यानंतर त्याला पोलिसांना पकडले. ज्यावेळी पोलिसांनी गज्याला ताब्यात घेतले तेंव्हा गाडीत इतरही तीन आरोपी होते.
Comments
Loading…