in

वकील असीम सरोदे यांची ईडीला नोटीस

लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यात ईडी नोटीसीचे सत्र सुरु असतानाचं आता ईडीलाचं ईडीची नोटीस धाडल्याचा प्रकार समोर आला आहे. वकील असीम सरोदे यांनी 1 हजार 440 रुपये थकवल्याप्रकरणी ईडीला नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अंजली दमानिया यांचे वकिल असीम सरोदे यांची मदत ईडीनं घेतली होती. यावेळी काही हजार कागदपत्रांची माहिती त्यांनी असीम सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती. मात्र माहिती देताना कागदपत्रांच्या झेरॉक्सचा खर्च हा ईडीला द्यावा लागेल हे त्यांनी स्पष्ट केले होतं.

ईडीनं त्यावेळी ते मान्यही केलं होतं, मात्र अजूनही ईडीनं त्यांचे 1 हजार 440 रुपये दिलेले नाहीत म्हणून त्यांनी चक्क ईडीलाचा नोटीस पाठवत पैशांची मागणी केली आहे.ईडीच्या ऑफिशीयल मेलवरती बिलाची प्रत देऊनही ईडीनं त्यांचे पैसे जमा केले नाहीत. त्यामुळे सरोदेंनी ईडीलाचा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे ईडी त्यांच्या नोटीशीला काय उत्तर देते ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जागतिक शाश्वत विकास परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश