in ,

‘बुलाती है मगर जाने का नहीं’…हा शेर मारणाऱ्या ‘त्या’ शायरला झाला कोरोना

Share

‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर सोशल मिडीयावर खुप प्रसिद्ध आहे. या शेर आतापर्यत असंख्य मिम्स आपण पहिल्या असतीलच. हा शेर ज्याने तयार केला त्या शायरालाच कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ या शेरनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.

“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video;स्वत;चा संसार पाण्यात वाहताना… असंख्य मुंबईकरांच्या संसारांना दिली मदतीची किनार

‘या’ राज्यात जोरदार पावसाची शक्यता