काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे खडसावले आहे.
मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वेने मिशन बिगन अगेन अंतगर्त महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करणार आहे. हा आरसीएफ जवान त्या महिलेची तपासणी करेल. जर त्या महिलेसोबत लहान मुलं आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
Comments
0 comments