in ,

५५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘नो ड्यूटी’ – मुंबई पोलीस आयुक्त

Share

मुंबई : महाराष्ट्रात सर्वात अधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईमध्ये आढळत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रशासन सुरक्षेसह सर्व प्रकारच्या आव्हानाला सामोरे जात असताना, आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाच्या या अवघड काळात पोलिसांवर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा वेळी पोलिसांना कोरोनाची लागण होणं आणि त्यांचा मृत्यू होणं, ही खूप चिंतेची बाब आहे.

मागच्या सलग तीन दिवसांपासून कोरोनामुळे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यामुळेच ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तावर न येण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान ५६ वर्षीय शिवाजी नारायण सोनावणे हे कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत होते, त्यांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला आणि वाहतूक विभागात एकच खळबळ उडाली. या अगोदर ५७ वर्षीय चंद्रकांत गणपत पेंढूरकर आणि ५२ वर्षीय संदीप सुर्वे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा  कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील पेंढुरकर हे वरळी येथील रहवाशी होते तर संदीप सुर्वे हे नवी मुंबईतील कामोठे वसाहतीतील रहिवासी होते.

दिवसेंदिवस मुंबईतील पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने मुंबई पोलिसांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाला आणि रस्त्यावर असलेला कोरोना योद्धांना दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जळगावात एकूण २४ कोरोनाग्रस्त, ९ रुग्णांचा मृत्यू

पालघर हत्याकांड प्रकरणानंतर उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या, आरोपींना अटक