in

नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना चर्चेसाठी खुले आव्हान, पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांना समर्थन देणाऱ्यांची मानसिकता तालिबानी असल्याची टीका केली, त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून चर्चेसाठी खुले आव्हानही दिलं आहे.

नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे की, भारत भूमी ही आपली माता आहे. आजवर मुघल- अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदूधर्मावर, हिंदुसंस्कृतीवर आणि धर्मस्थळांवर वारंवार हल्ले करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न झाले.

तरी विशाल ह्रदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही भारतभूमीनं समावून घेतलं. त्यांच्या कलाकृतींचे, साहित्य संस्कृतीचे जतन व संवर्धनही केले. त्यामुळेच आज या देशात अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. विशेषत: उर्दू लेखनाच्या तुमच्या कौशल्याचं भारतवासीयांनी नेहमी कौतूकच केलेलं आहे. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदू राजानं आजवर कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.

राणे यांनी म्हटलं आहे की, हिंदूत्त्व मुळातच एक समतोल जीवनशैली आहे. सर्वप्रकारच्या उपासना पद्धती व श्रद्धांना इथं स्थान आहे. त्यामुळेच सहिष्णूता आणि घर्मानिरपेक्षता इथल्या हिंदूचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळंच तर सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की हिंदू ही एक जीवनपद्धती व शैली आहे आणि इथल्या संस्कृतीचा गाभा आहे.

नितेश राणे पत्रात म्हणतात, जो ही व्यक्ती या देशात राहतो, तो या देशाला आपली मातृभूमी समजून प्रेम करत असेल, इथल्या संस्कृतीशी एकरूप झाला असेल तो आमच्यासाठी हिंदू आहे, मग त्याचा धर्म व उपासना पद्धती कोणतीही असेल! हीच समरसतेची विचारधारा व पद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. आपण ज्या उर्दू भाषेत लोकप्रिय गीत लेखन करता ती उर्दूभाषा आपल्या गीतांनी व कवितांनी मोठी केली आहे. तिला अधिक व्यापक बनवलं आहे, यात फिराक गोरखपुरी अर्थात रघुपती सहाय, बृजमेहन कैफी, राजेंद्रसिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क अशा अनेक कवी व साहित्यिकांचे नावं घेता येतील, असं राणे यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बेळगाव मनपावर भगवा फडकेल- संजय राऊत

Afganisthan | पंजशीरवर तालिबान्यांचा ताबा !