in

BMC Election 2022 : भाजपाने कसली कंबर..मनपा निवडणुकीसाठी नितेश राणेंकडे मोठी जबाबदारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आज भाजपाची बैठक बोलवण्यात आली होती. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीत मनपा निवडणुकीबाबत मोठी घोषणा झाली आहे. मुंबई मनपाच्या भाजपाच्या कोअर कमिटीत नितेश राणे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’ सुरू झालं आहे. मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडवलं. शिवसेनेच्या या खेळीनं सर्वाधिक १०५ आमदार असूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी भाजपानं मुंबई ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे.

अलीकडेच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लावून भाजपानं मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक कोअर कमिटीत आमदार नितेश राणेंचा समावेश करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण