in

फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?”, राणें बंधूंचा हल्लाबोल

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. अहिल्याबाई शिक्षण मंडळासमोरील रस्त्यावर उतरून विद्यार्थांनी आपला संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते नितेश राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी “फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?” असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही??” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे यांनी देखील राज्यात बियर बार, डान्स बार सकाळी पाच वाजेपर्यंत रोज चालतात, पण महाराष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची MPSCपरीक्षा पुढे ढकलली. असं हरामी सरकार कुठेच नसेल. अशा शब्दात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. MPSCची परीक्षाही झाली पाहिजे असं म्हटलं आहे. “यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार टॅग करत याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam Postponed : एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय; मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

MPSC Exam Postponed;’नाईट क्लब चालतात, मग परीक्षा का नाही ?’; नेत्यांचा ‘मनसे’ सवाल