in

निकिता तोमर हत्या प्रकरण : तौसिफ आणि रेहानला ठरवलं हरियाणा कोर्टाने दोषी

हरियाणामधील फरीदाबादमध्ये २६ ऑक्टोबर रोजी तौसीफ नावाच्या एका आरोपीने घडलेल्या निकिता तोमरला गोळी मारली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरुन होते.

या प्रकरणी आता मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. २१ वर्षीय निकिता तोमरची गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. १ डिसेंबरला याप्रकरणी खटल्याची सुनावणी सुरु होती. यानंतर तब्बल चार महिन्यांनी फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी आरोपींना दोषी ठरवलं.

२१ वर्षीय तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर ही हत्या करण्यात आली होती. तौसिफ आणि रेहान यांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा निकिताने विरोध केला तेव्हा तौसिफने बंदूक काढली आणि गोळी चालवली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

पोलिसांनी अटक केल्यानंतर तौसिफने पोलिसांनी निकिता दुसऱ्याशी लग्न करणार असल्याने आपण हत्या केल्याचं सांगितलं होतं. निकिताच्या कुटुंबाने २०१८ मध्ये दाखल केलेल्या केसमुळे आपलं करिअर उद्ध्वस्त झाल्याचा दावाही तौसिफने केला होता. “अटक झाल्याने मी मेडिसिनचा अभ्यास करु शकलो नाही. यामुळे मी बदला घेतला,” असं तौसिफने म्हटलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत कोरोना रुग्णांचा स्फोट , २४ तासांत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची वाढ

Corona Virus : नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा 30 हजार पार