in

आता लहानमुलांसाठी येणार ‘कोरोना लॉलीपॉप टेस्टींग किट’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचं मत होतं की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळे मुलांचे पालक चिंतेत आहेत. अशातच आता वैज्ञानिकांनी लहान मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी एक अनोखं टेस्टींग किट विकसित केली असल्याचं समोर येत आहे.

लहान मुलांच्या नाकातून आणि घशातून स्वॅब घेण्यासाठी अडचण येते, अशा मुलांसाठी नवीन टेस्टींग किट तयार करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटला ‘लॉलीपॉप टेस्टींग किट’ असं नाव देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियात किंडरगार्टन येथील मुलांवर या किटचा वापर करण्यात आला आहे. येथील सरकारनं मोठ्या प्रमाणात मुलांच्या टेस्टींगसाठी याचा वापर सुरू केला आहे. मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी लॉलीपॉप टेस्टींग किट प्रभावी ठरत आहे. त्याचबरोबर 15 मिनिटांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”पंतप्रधान मोदी- शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरला”

Farmer MSP | खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्राचा MSP संदर्भात मोठा निर्णय