in

नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp चं स्पष्टीकरण

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क
जगभरातून झालेल्या टिकेला उत्तर म्हणून whatsapp ने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.

“तुमचे खासगी मेसेज संबंधी आधीप्रमाणेच 100 टक्के गोपनीयता पाळली जाणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमचे मेसेज चॅटिंग सुरक्षित ठेवले जातील. तर नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे” असे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिलं आहे.

कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण देताना एक ग्राफिक शेअर केले आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिलं आहे
WhatsApp तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.
WhatsApp तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
WhatsApp तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.
WhatsApp वरील तुमचे ग्रुप अजूनही प्रायव्हेट आहेत.
तुम्ही तुमचे मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात. आणि तुम्ही तुमचा डेटा डाउनलोड करु शकतात.

दरम्यान, नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे किंमत?

राज्यात 511 ठिकाणी लसीकरण होणार – राजेश टोपे