in

महाडमधील नव्या पोलीस वसाहतीचे अखेर लोकार्पण…

भारत गोरेगावकर, रायगड | रायगड जिल्ह्यातील महाड येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वसाहतींचा आज अखेर लोकार्पण करण्यात आला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई तसेच अप्पर आयुक्त हे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते तर पालकमंत्री अदिति तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे,पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधिक्षक अशोक दुधे उपस्थित होते.

पोलीस वसाहत म्हटली की बैठी चाळ आणि जेमतेम 300 त 400 चौरस फुटाच्या खोल्या डोळ्यासमोर यायच्या महाडमधील या वसाहतीत 1200 ते 1400 चौरस फुटाचे घर शिवाय आधुनिक सुखसोईने सुसज्ज घरे मिळालेल्याने पोलिसांच्या चेहर्‍यावर समाधान व्यक्त होत होते. एकूण 108 कुटुंबांसाठी उभ्या राहिलेल्या वसाहतीमध्ये 12 अधिकारी तर 96 कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था करण्यात आली आली.विशेष म्हणजे या वसाहती मध्ये इनडोअर, आऊट डोअर जिम, बगिचा, पार्किंग सारख्या सवलती देण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिलांचे लसीकरण करून नवरात्रोत्सव साजरा करा

या कामगिरी साठी होत आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक