in

Corona Mumbai | ‘हा’ आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट

संपूर्ण राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालत आहे. गेल्या वर्षी कोरोनाने मुंबईच्याधारावीत थैमान घातलं होतं. संपूर्ण धारावीला आपल्या विळख्यात घेतलं होतं. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आता धारावीसारख्या झोपडपट्टी परिसराऐवजी आता उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीऐवजी आता कोरोनाने अंधेरी भागाकडे कूच केली आहे. मुंबईतील या भागात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत.

सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेले देशातील दहापैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 3,512 नवे कोरोना रुग्ण आढळले त्यानंतर आता एकूण 3,69,426 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भाग हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. आठवड्यातील रुग्णवाढीचा दर हा 0.97% आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन लवकरच जुहू बीच बंद ठेण्याच्या तयारीत आहे. सोमवारपासून तिथं अँटिजेन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी पालिकेचे सहआयुक्त माहिती विश्वास मोटे यांनी एका वृत्तापत्राला दिली आहे.

शहरातील वाढती कोरोना प्रकरणं पाहता बीएमसीने खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील कुणी हे सण साजरे करताना दिसलं तर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही पालिकेने दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये वीज तोडणीने संतप्त शेतकऱ्यांनी कोंडले भाजपा आमदाराला

जाणून घ्या, आयुक्त रश्‍मी शुक्लाच्या अहवालातील महादेव इंगळे नक्की कोण ?