लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गुड फ्रायडेच्या दिवशी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची इच्छा आहे. मात्र, कोरोनाच्या काळात फक्त यावर अवलंबून न राहता निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. यासंदर्भात नेटफ्लिक्स यांच्याशी चर्चा सुरू देखील होती. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मने अक्षयचा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला आहे.
लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल. 24 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. नेटफ्लिक्सच्या या निर्णयानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निवल यांच्याशी चर्चा करीत आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
Comments
Loading…