लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठविला आहे. त्यांनी राजस्थानच्या हनुमानगड किसान महापंचायतीचा एक व्हिडिओ शेअर करून त्यामध्ये “मोदी सरकारचे दिवस ना खरे, ना चांगले!” आमचे अण्णादाता देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी शांततेत संघर्ष करीत आहेत, आणि मी त्याचा पाठीशी आहे अस म्हणत मोदी सरकार विरोधात हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शेतकरी आंदोलनाचा आवाज उठविण्यासाठी हनुमानगड जिल्ह्यातील पिलीबंगा तहसील गाठले. त्यावेळी त्यांनी किसान महापंचायतीला भाषण करताना राहुल गांधींनी केंद्र सरकारविरूद्ध जोरदार टीका केली आहे. तर कॉंग्रेसने नेहमीच देशातील 70 टक्के लोकसंख्या वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत, अनेक वर्षांपूर्वी कुटुंबनियोजनाचा नारा होता की हम दो हमारे दो. जसा कोरोना आता वेगळ्या रुपात आला आहे, त्याचप्रकारे हा नाराही दुसऱ्या स्वरुपात आला आहे. हा देश चार लोक चालवतात. प्रत्येकाला त्यांची नावं माहित आहेत. हम दो हमारे दो हे कोणाचं सरकार आहे.
Comments
Loading…