in

NEET Result 2020 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर; शोएबने रचला इतिहास

Share

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झाला आहे.

देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी ‘नीट’ मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते. महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे.

शोएब आफताबने रचला इतिहास

नीट 2020 या परीक्षेत शोएब आफताबने इतिहास रचला आहे. त्याने परीक्षेमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. 720 पैकी 720 गुण मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. यापूर्वी कोणालाही शंभर टक्के मार्क मिळवता आले नाहीत.

असा चेक करा रिझल्ट

  • अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर भेट द्या.
  • Result लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
  • नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंगनाविरोधात FIR दाखल करा, वांद्रे कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश