in

जनआशीर्वाद यात्रेवरून राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

‘आधी केलेलं पाप धुवून काढा,मगच आशीर्वाद मागा’ ,असा मजकूर असलेले पोस्टर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ठाणे शहरात वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर लावले आहेत.इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत.महागाई वाढत असताना भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली.या यात्रेच्या वतीने जनतेचे आशीर्वाद मागितला जाईल असे भाजपकडून सांगितले जात आहे.मात्र इंधन दरवाढीने आणि महागाईने सामान्य जनता त्रस्त असताना कोणत्या तोंडाने आशीर्वाद मागता? असा सवाल करत राष्ट्रवादी कडून होर्डींग्स लावण्यात आले आहेत.

ठाणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपांच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “१६ ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्यात भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षाप्रमाणे अनेक खोट्या घोषणा केल्या. महागाई कमी करु, शंभर लाख कोटींची गुंतवणूक करुन रोजगार निर्मिती करु, अशी आश्वासने दिली. पण, वस्तूस्थिती अशी आहे की, दोन दिवसांपूर्वी जो गॅस सिलिंडर ८३४ रुपये होता, तो आता २५ रुपयांनी वाढून८५९ रुपये ९० पैसे झाला आहे. पेट्रोल १०८ तर डिझेल ९८ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांचा खोटा आशीर्वाद घेण्याचे काम भाजप करीत आहे”.अशी खरमरीत टीका आनंद परांजपे यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तानात मिरवणुकीत दरम्यान बॉम्बस्फोट

द कपिल शर्मा शो मध्ये ‘लॉटरी’