in

राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते पक्षप्रवेश करणार

Share

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. कारण ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर आता भाजपमध्ये गळती सुरु झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र तरीही उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण आता एकनाथ खडसे यांच्या वरदहस्ताने भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक जिंकणारे भाजप आमदार संजय सावकारे हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रवेश सोहळ्यात भाजपमधील दोन मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याची राजकीय सूत्रांची माहिती आहे.

‘त्या’ पोस्टरवरून चर्चेला उधाण

भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जाहिरात दिली होती. दरवर्षी या जाहिरातीत भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच असायचा, मात्र यंदाच्या वर्षी महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्याऐवजी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लसीकरणासाठी सर्व सज्जता – राजेश टोपे

अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील 7 क्रू मेम्बर्सना कोरोना