in

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

Share

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे, ते 60 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, काही दिवसांतच कोरोनावर मात करुन ते घरी परतले. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण आहेत भारत भालके?

 • पंढरपूर- मंगळवेढ्यातून काँग्रेस आमदार भारत भालके
 • भारत भालके यांनी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती.
 • काँग्रेसच्या अनेक बैठकांना पाठ फिरवली
 • भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते
 • भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला

भारत भालके यांच्या निवडणुकांचा इतिहास

 • 2004 : शिवसेना – पराभूत
 • 2009 : रिडालोस – विजयी
 • 2014 : काँग्रेस- विजयी
 • 2019 : राष्ट्रवादी – विजयी
 • हॅटट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख
 • 2009 मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले
 • 2019 मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला
 • 2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहत होते
 • 1992 मध्ये ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली

भारत भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

लस आधी भारतीयांनाच !