in

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बॅंकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील येरवडा कारागृहात त्यांचा ताबा घेण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 मार्चपर्यंत “ईडी’ कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी ही शिवाजीराव भोसले बॅंकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भोसले यांच्यासह चौघांना ता. 25 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात होते. यानंतर शिवाजीराव भोसले बॅंकेतील या गैरव्यवहारप्रकरणी “ईडी’ने गुन्हा दाखल केला होता.

त्यांना ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. भोसले यांना याच गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पूर्वीच अटक केली आहे. दरम्यान, ‘ईडी’ने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर ‘ईडी’ने अनिल भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, चीफ अकाउंटंट शैलेश भोसले यांना अटक केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना इफेक्ट : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

‘हा’ प्रकल्प हातातून जाता कामा नये, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र