in

कार जाळायच्या का? जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांना सवाल…

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दराप्रमाणे चांगलेच भडकले आहेत. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर ते प्रश्नाची सरबत्ती करून प्रश्न विचारत आहेत. यातच त्यांनी आता कार जाळायच्या कि चालवायच्या असा सवाल बिग बी अमिताभ बच्चन यांना विचारला आहे. याआधी ते अक्षय कुमार वरही भडकले होते. तर एकंदरीत हा भडका-भडकीचा कार्यक्रम काय आहे तो सर्वप्रथम जाणून घेऊयात.

Jitendra Awhad Tweet

खरं तर हे प्रकरण देशभरात सुरु असलेल्या इंधन दरवाढीवरच आहे. देशात गेल्या सलग 20 दिवसापासून मोठी वाढ होत चालली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान अशीच इंधन दरवाढीची परिस्थिती 2012 साली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून सत्ताधारी पक्षावर टिक्का केली होती. ते ट्विटमध्ये म्हणाले होते कि, “पंपवरील सेवक विचारतो- कितीचे पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकर म्हणतो- 2-4 रुपयांचे कारवर शिंपड, जाळून टाकतो.” आता हि अशीच परिस्थिती असताना बच्चन यांनी मौन बाळगलं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांना विचारलंय , “तुम्ही पेट्रोल पंपवर जावून पेट्रोल भरले नाही? ( Petrol-Diesel Price ;सलग 20 व्या दिवशी इंधन दरवाढ ) का तुम्ही बिल पाहिले नाही? ही बोलण्याची वेळ आहे. तुम्ही तरी पक्षपातीपणा करणार नाही, अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या.” त्यामुळे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे आज शांत आहेत? यावर त्यांचा संताप व्यक्त होतोय.यापूर्वी अक्षय कुमारनेही ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र सध्या होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर सर्वांनी मौन पाळल्याने जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. त्यामुळे आता आव्हाडांनी केलेल्या ट्विटवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार काय उत्तर देतात हे पाहणे मह्त्वाचे ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Petrol-Diesel Price ;सलग 20 व्या दिवशी इंधन दरवाढ

राज्य सरकारचा मोठा निर्णय; रोजगारासह पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना