in ,

एनसीबीचे पथक आज मुंबईत; समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी होणार?

आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये प्रमुख साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली. त्यातले 8 कोटी हे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे होते असं प्रभाकर साईलने म्हटलं आहे. या प्रकरणात पंच म्हणून माझी सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. मला ज्या कागदांवर सह्या करायला लावल्या. सईल यांनी हेदेखील सांगितलं मी माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचितांकडे 10-12 दिवस राहिलो होतो.

मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी बुधवारी दिल्लीहून मुंबईला जातील. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्रांती रेडकरला आरोह वेलणकरचा पाठिंबा; पहिला मराठी अभिनेता

भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिनला WHO कडून मान्यता कधी?